विकसित भारत @ २०४७ आणि ग्रामीण रोजगार हमी
प्रवास, बदल आणि पुढील दिशा
विकासाच्या प्रवासात ग्रामीण रोजगाराचा प्रश्न हा केवळ आर्थिक विषय नसून तो सामाजिक सुरक्षा, सन्मान आणि लोकांच्या जगण्याच्या हक्काशी जोडलेला प्रश्न आहे.
ही पुस्तिका “विकसित भारत @ २०४७ आणि ग्रामीण रोजगार हमी : प्रवास, बदल आणि पुढील दिशा” ग्रामीण रोजगार हमीच्या बदलत्या प्रवासाचा अभ्यास करते. महाराष्ट्र रोजगार हमी कायद्यापासून मनरेगा आणि पुढील नव्या धोरणात्मक चौकटीपर्यंतच्या प्रवासाकडे लोककेंद्री दृष्टिकोनातून पाहण्याचा हा प्रयत्न आहे.
ही पुस्तिका कोणत्याही भूमिकेचे समर्थन किंवा विरोध करण्यासाठी नसून, रोजगार हमीच्या संकल्पनेतील बदल, त्यामागील गृहीतके, संभाव्य परिणाम आणि ग्रामीण समाजासमोरील प्रश्न यावर विचारमंथन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
ही पुस्तिका BELIEFS (Better Livelihood and Education through Fundamental Studies), Nashik यांच्या अनुभव, अभ्यास आणि ग्रामीण समुदायांसोबतच्या कामाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आली आहे. BELIEFS ही ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये उपजीविका, महिला नेतृत्व, हक्काधारित हस्तक्षेप आणि स्थानिक विकासासाठी कार्यरत संस्था आहे.
BELIEFS ही २०२२ पासून कार्यरत असलेली सामाजिक विकास संस्था आहे. या कार्याचा विस्तार आणि संस्थात्मक बळकटीकरण करण्यासाठी BeliefsIndia Foundation ही स्वतंत्र कायदेशीर संस्था स्थापन करण्यात आली आहे. दोन्ही संस्थांचा मूलभूत दृष्टिकोन समान आहे — समुदाय आधारित विकास, शिक्षण, उपजीविका आणि समावेशक परिवर्तन.
या पुस्तिकेचा उपयोग ग्रामसभा, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील व्यक्तींसाठी संदर्भ दस्तऐवज म्हणून व्हावा, ही अपेक्षा आहे.
Author: Laxmikant Jadhav, Founder – BELIEFS
This publication reflects the experiences, reflections and learning emerging from grassroots work and continuous engagement with the development sector.
