BELIEFS संस्थेची “संवाद विकासासाठी” कार्यशाळा

BELIEFS संस्थेची “संवाद विकासासाठी” कार्यशाळा

अनुभवांची देवाणघेवाण, महिला नेतृत्व आणि समुदाय संवादाला बळ देणारा उपक्रम

पाडा ते पंचायत: गावविकास नेतृत्वनिर्मितीची मार्गदर्शिका

८ जुलै २०२५ रोजी BELIEFS संस्थेच्या वतीने नाशिक शहरात “संवाद विकासासाठी” विशेष संवाद व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये टाकेहर्ष, डहाळेवाडी, दुबे वाडी, दयाचीवाडी आणि निरगुडपाडा या गावांमधून आलेल्या पाडा समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, महिला सदस्य आणि PESA मोबिलायझर अशा एकूण ५३ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यशाळेची सुरुवात स्वागताने झाली. संपूर्ण कार्यक्रमामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि नेतृत्व विकासावर भर देण्यात आला.

सुरुवातीच्या सत्रामध्ये BELIEFS संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लक्ष्मीकांत जाधव यांनी संस्थेचा कार्यदृष्टिकोन, शाश्वत विकास, अधिकाराधारित ग्रामविकास आणि संवैधानिक मूल्यांशी असलेली बांधिलकी यावर मार्गदर्शन केले. ग्रामसभा ही महिलांच्या नेतृत्व उभारणीसाठी महत्त्वाची पायरी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेमध्ये रोजगार हमी, असुरक्षा, रेशन कार्ड, ग्रामसभा आणि स्थानिक शासन व्यवस्थेतील महिलांचा सहभाग यासंदर्भात अनुभव कथन करण्यात आले. महिलांनी अर्ज प्रक्रियेपासून ग्रामसभेपर्यंतच्या प्रवासातील अडचणी आणि शिकवणी सामायिक केल्या.

या कार्यशाळेमध्ये:

  • महिला संघटनाचे महत्त्व
  • सामूहिक निर्णय प्रक्रिया
  • ग्रामपंचायत स्तरावरील सहभाग
  • लिंगभेदावर आधारित अडथळे
  • समुदाय नेतृत्व विकास

या विषयांवर चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित महिलांनी १५ ऑगस्टपूर्वी गावांमध्ये ओळखपत्र शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प केला. तसेच BELIEFS संस्थेच्या “कागदपत्रांच्या सोप्या वाटा” या शासकीय कागदपत्र मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

ही कार्यशाळा ग्रामीण महिला नेतृत्व, अनुभवांची देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून “संवादातून विकास” या संकल्पनेला बळ देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.

Published by: BELIEFS
Platform:BeliefsIndia Foundation
This publication reflects the experiences, reflections and learning emerging from grassroots work and continuous engagement with the development sector.

Scroll to Top