म पासून महिला आणि म पासून मनरेगा

म पासून महिला आणि म पासून मनरेगा

महिला सहभागीय मनरेगा गाव विकास आराखडा उपक्रम

म पासून महिला आणि म पासून मनरेगा ही पुस्तिका BELIEFS संस्थेच्या महिला सहभागीय मनरेगा गाव विकास आराखडा उपक्रमाचे दस्तऐवजीकरण आहे.ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना केवळ रोजगार योजनेची माहिती देणे नव्हे, तर त्यांना गावाच्या विकास नियोजन प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून स्थानिक नेतृत्व विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.BELIEFS संस्थेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींमधील १० गावांमध्ये हा उपक्रम राबविला. या प्रक्रियेत ५६५ मजुरांनी काम मागणी अर्ज सादर केले, त्यापैकी ६२% महिला मजूर होत्या. महिलांनी गावाच्या गरजांवर आधारित १८४ विकासकामे सुचविली.या उपक्रमातून महिलांमध्ये मनरेगा योजनेबाबत जागरूकता, नियोजन क्षमता आणि स्थानिक विकासामध्ये नेतृत्वाची भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.ही पुस्तिका BELIEFS च्या ग्रामीण विकास, महिला नेतृत्व आणि समुदाय आधारित नियोजनाच्या अनुभवांचे दस्तऐवजीकरण करते..
Published by: BELIEFS
Platform:BeliefsIndia Foundation
This publication reflects the experiences, reflections and learning emerging from grassroots work and continuous engagement with the development sector.

म पासून महिला आणि म पासून मनरेगा : महिला सहभागीय मनरेगा गाव विकास आराखडा उपक्रम

Scroll to Top