पाडा ते पंचायत

पाडा ते पंचायत

गावविकास नेतृत्वनिर्मितीची मार्गदर्शिका

पाडा ते पंचायत ही पुस्तिका BELIEFS संस्थेच्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील गावपातळीवरील नेतृत्वनिर्मितीच्या अनुभवांवर आधारित मार्गदर्शिका आहे.
BELIEFS संस्था २०२२ पासून महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी समुदायांसोबत उपजीविका, शिक्षण, महिला नेतृत्व, शाश्वत शेती आणि समुदाय आधारित विकासासाठी कार्यरत आहे.
गावाचा विकास केवळ योजना उपलब्ध करून देण्याने होत नाही, तर त्या योजनांमध्ये आणि निर्णय प्रक्रियेत स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग आवश्यक असतो. विशेषतः पाड्यांमध्ये राहणाऱ्या महिलांना निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या उद्देशाने BELIEFS ने पाडा सखी समिती, पाडा समिती संघ आणि ग्राम नेतृत्व मंडळ अशा स्थानिक नेतृत्व रचना विकसित करण्याचा प्रयत्न केला.
"पाडा ते पंचायत" ही त्याच प्रक्रियेची एक मार्गदर्शिका आहे. पाडा पातळीवरून सुरुवात करून ग्रामपंचायत आणि स्थानिक शासन व्यवस्थेपर्यंत महिलांचे नेतृत्व कसे विकसित होऊ शकते, याचा अनुभव, प्रक्रिया आणि कृती मार्ग या पुस्तिकेत मांडला आहे.
या पुस्तिकेमध्ये: 
पाडा समितीची संकल्पना आणि भूमिका
पाडा समिती संघाची रचना
BELIEFS ग्राम नेतृत्व मंडळाची भूमिका
समुदाय सहभागातून घडलेले अनुभव
ग्रामविकासासाठी उपयोगी नमुने व मार्गदर्शक साधने

यांचा समावेश आहे.
ही पुस्तिका केवळ BELIEFS च्या कामाचा अहवाल नसून, स्थानिक समुदायांनी स्वतःचे नेतृत्व उभे करण्यासाठी वापरता येईल असे एक व्यवहार्य साधन आहे.
Published by: BELIEFS
Platform:BeliefsIndia Foundation
This publication reflects the experiences, reflections and learning emerging from grassroots work and continuous engagement with the development sector.

पाडा ते पंचायत: गावविकास नेतृत्वनिर्मितीची मार्गदर्शिका

Scroll to Top