ग्रामीण भागात उपजीविकेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे शेती. आदिवासी भागात नागली, वरई आणि भात ही मुख्य पिके आहेत. मागील काही वर्षांत नागली आणि वरई ही पौष्टिक तृणधान्ये हळूहळू नष्ट होऊ लागली आहेत. या पिकांचे क्षेत्र घटल्याने आदिवासी शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर आणि पोषणावर परिणाम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त, बिलीफ्स संस्था (BELIEFS) आणि महाबीज कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून एक छोटासा पण महत्त्वपूर्ण बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे —
✅ स्थानिक स्तरावर सुधारित आणि रोग-प्रतिरोधक वाणांची निर्मिती
✅ पारंपरिक पिकांद्वारे महिलांच्या उत्पन्नात वाढ
✅ नागली–वरई पिकांच्या संवर्धनातून शाश्वत उपजीविका उभारणे
🌾 या प्रयत्नातून केवळ बियाणे नव्हे, तर एक नवीन आशा आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग रुजत आहे.
संपूर्ण बातमी वाचा:
महाबीजच्या सहकार्याने नागली–वरई बीजोत्पादनाचा उपक्रम
